गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी जाहीर.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी जाहीर.!

दि. 24 मार्च 2024 

Vidarbha News India 

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी जाहीर.!

Lok Sabha elections 2024 :

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने आज महाराष्ट्रातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नेते यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्याशी होणार आहे.

अशोक नेते हे १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. त्यानंतर २०१४ पासून ते आजतागायत खासदार आहेत. आता पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांच्यासह आ. डॉ. देवराव होळी, डॉ. मिलिंद नरोटे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे इच्छूक होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज भाजपने अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी देऊन सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला.


Share News

copylock

Post Top Ad

-->