दि. 13 मार्च 2024
Vidarbha News India
अखेर आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नाला आले यश; पोलीस भरतीमध्ये खुल्या प्रवर्गात जागा.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने पोलीस भरती करत असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले यश
भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या सातत्य पाठपुरावाने पोलिस भरतीचा तिढा सुठला तसेच जिल्ह्यातील हजारो खुल्या प्रवर्गातील युवकांना भरती मध्ये भाग घेता येईल.
पोलीस भरती मध्ये खुल्या प्रवर्गातील तसेच Ews साठी एकही आरक्षित जागा नाही त्यामुळे हजारो युवकांचे पोलिस भरतीचे स्वप्न धुडीस मिळेल त्याकरिता आम्हाला न्याय देण्यात यावा अश्या प्रकारचे निवेदन आमदार डॉ. देवराव होळी यांना भेटून हजारो युवकांनी निवेदन दिले होते.
त्याची तात्काळ दखल घेऊन माननीय आमदार डॉ देवराव होळी साहेव यांनी सर्व युवकांना स्वतः गाडी करून घेऊन नागपूर गाठून माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस याची भेट सर्व युवकांना घालून दिली आणि वस्तूस्थिती लक्षात आणून देऊन खुल्या प्रवागातील युवकांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
त्यावर माननीय उपमुख्यमंत्री यांनी लगेच सर्व युवकांना न्याय मिळवून देऊ आणि तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते.
त्यावर आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला आणि तब्बल खुल्या प्रवागासाठी 70 सीट EWS साठी 50 सीट आणि SEBC साठी 50 सीट असे एकूण 170 जागा आरक्षित करून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना न्याय देण्यात आला.
भाजप बंगाली आघाडी जिलाध्यक्ष सुरेश शहा यांनी गडचिरोली जिल्यातील हजारो युवकांना न्याय दिल्या मुळे भाजप बंगाली आघाडी गडचिरोली तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ज्यांनी हजारो युवकांसाठी अथक प्रयत्न केले असे सर्वांचे लाडके तथा गडचिरोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी यांचे खूप खूप आभार व्यक्त केले.