दि. 13 मार्च 2024
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे अभिनंदन व सत्कार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली पोलीस भरती मध्ये खुल्या प्रवर्गात जागा मिळण्याकरिता पोलीस भरती प्रशिक्षक मुलांनी आमदार होळी यांच्याकडे पाठपुरावा केला. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांची गरज लक्षात घेऊन त्याची तात्काळ दखल घेत आमदार होळी यांनी सर्व युवकांना स्वतः गाडी करून घेऊन नागपूर गाठून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट सर्व युवकांना घालून दिली. व वस्तूस्थिती लक्षात आणून देऊन खुल्या प्रवर्गातील युवकांना न्याय मिळावा अशी मागणी केली. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. या प्रक्रियेमध्ये गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांचाही खूप मोलाचा वाटा असून त्याबद्दल आमदार साहेबांच्या हस्ते पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, कृषी.उ.बा.स. संचालक हेमंत बोरकुटे, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक राठी हें उपस्थित होते.