दि. 20 मार्च 2024
वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या; आ. डॉ. देवराव होळी यांची मागणी
- गडचिरोली जिल्ह्यात आकस्मिक आलेल्या वादळी पावसामुळे मका ,यासह शेतीकांचे प्रचंड नुकसान.!
- तोंडात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये आकस्मिक गारपीटी सह आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील उभे असलेले मक्याचे अन्य पीक पूर्णतः उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रशासनाला केली आहे.
मक्याचे पीक झालेले असताना अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे तोंडात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार महोदयांनी केली आहे.