निवडणूक निरीक्षकांकडून अतिसंवेदनशील मतदान केंद्राची पाहणी.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

निवडणूक निरीक्षकांकडून अतिसंवेदनशील मतदान केंद्राची पाहणी.!

दि. 6 एप्रिल 2024 

Vidarbha News India 

निवडणूक निरीक्षकांकडून अतिसंवेदनशील मतदान केंद्राची पाहणी व मार्गदर्शन.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह, निवडणूक खर्च निरीक्षक एस वेणूगोपाल, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी शुक्रवारी सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

त्यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. तसेच अहेरी व नागेपल्ली येथील मतदान केंद्रांची पाहणी करुन मतदान केंद्राध्यक्ष व अधिकार्‍यांना प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शनही केले.

sensitive elections लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर क्षेत्रात मतदान होणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. या निर्वाचन क्षेत्रात एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून तेलंगाणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांची सीमा लागून असलेल्या तसेच सर्वाधिक अतिसंवेदनशील अशा अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपली येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी येथील स्ट्राँग रूम ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणार्‍या साहित्यांची पाहणी केली. तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावसाठी शेड व इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी सुद्धा मतदान पथकांच्या दुसर्‍या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख तसेच अहेरी उपविभागातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->