दि. 28.05.2024
गडचिरोली : रामपूरमध्ये डेंग्यूचा कहर सुरुच, रुग्णसंख्या २२ वर पोहचली.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपूर येथे डेंग्यूचा उद्रेक झाला असून तीन दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. सोमवार अखेरपर्यंत येथे रुग्णसंख्या २२ झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
चंद्रपूर सीमेवरील गोंडपिंप्रीजवळ रामपूर हे गाव आहे. येथे २२ मे रोजी डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी रुग्ण आढळून आले. २५ मे अखेरपर्यंत ११ रुग्ण निष्पन्न झाले. २७ मे अखेर ही संख्या २२ वर जाऊन पोहोचली. १३ रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालयात, ८ रुग्णांवर चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून एक रुग्ण घरीच आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने आतापर्यंत गावातील सुमारे शंभर लोकांचे रक्तनमुने तपासणी घेतले आहेत. बहुतांश रुग्ण ते वयाची साठी पार केलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंप्रीला चिकटून रामपूर आहे. तेथून डेंग्यूची साथ पसरल्याचा अंदाज आहे.
• रामपूरमध्ये तापाच्या सर्वेक्षणाची मोहीम राबवली. घरोघर जाऊन पाणी साठवणुकीची भांडे. इम तपासले आहेत. ग्रामस्थांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. डेंग्यूची लक्षणे आढळल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्य विभागाचे पथक परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.
- डॉ. प्रफुल्ल हुलके, तालुका आरोग्य अधिकारी, चामोर्शी