दि.16.05.2024
राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; तर मान्सूनच्या आगमनाचा दिवसही ठरला.!
विदर्भ न्यूज इंडिया
Weather Update| मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेले चित्र पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण देखील पाहायला मिळाले. यातच आता राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
तर नाशिक, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
‘या’जिल्ह्यात पावसाची शक्यता Weather Update|
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, सातारा, जालना, कोल्हापूर, बीड, धाराशिव, धुळे, सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. हीच स्थिती पुढील काही दिवस राहण्याचा अंदाज आहे.
31 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता Weather Update|
तर दुसरीकडे, 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये धडकणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 12 जूनच्या आसपास सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून वर्ततवण्यात आला आहे.