कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना दहा वर्षाची शिक्षा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना दहा वर्षाची शिक्षा.!

दि. 17.05.2024

Vidarbha News India 

कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना दहा वर्षाची शिक्षा.!

विदर्भ न्यूज इंडिया 

प्रतिनिधी/गडचिरोली :  पदवीचे शिक्षण घेणारी २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती.

या प्रकरणात १७ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दाेन्ही आरोपींना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास व पाऊणे तीन लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

प्रशांत उत्तम जोगे (३२) व रवींद्र सुमराज मडावी (२५, दोघे रा. बेलगाव ता. कुरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित २३ वर्षीय मुलगी सायकलवरुन गावातून कुरखेडा येथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायची. ३ मार्च २०१८ रोजी ती नित्याप्रमाणे सायकलवरुन जात होती. वाटेत प्रशांत जोगे व रवींद्र मडावी यांनी दुचाकीवरुन येऊन सायकलला धडक दिली. ती खाली कोसळताच दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्त्याने घेऊन गेले. रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर जंगल परिसरात दुपारी १२ ते साडेबारा दरम्यान तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडितेने तीव्र विरोध केला तेव्हा रवींद्र मडावीने तिचे हातपाय पकडले व प्रशांत जाेगे याने टोकदार वस्तूने तिला जखमी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर तिच्याशी कुकर्म केले. ७ मार्च २०१८ रोजी कुरखेडा ठाण्यात बलात्कार, विनयभंग, मारहाण आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर व उपनिरीक्षक विजय वनकर यांनी तपास करुन

दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम एम. मुधोळकर यांनी साक्षीपुरावे व जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व २ लाख ७४ रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याबाबत आदेशात नमूद आहे.

...अन् पीडितेने केली स्वत:ची सुटका
याची वाच्यता केल्यास आई- वडील यांना ठार करु, अशी धमकी दिली. यानंतर रवींद्रनेही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगावरील कपडे फाडत असताना तिने दोघांच्या तावडीतून निसटून पळ काढला. याचवेळी रस्त्यावरुन एक मुलगी दुचाकीवरुन जात होती. तिला हात करुन पीडित मुलगी घरापर्यंत पोहोचली.

वैद्यकीय अहवाल ठरला महत्त्वाचा
या प्रकरणात वैद्यकीय अहवाल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. जिल्हा सरकारी वकिल अनिल एस. प्रधान यांनी न्यायालयापुढे सक्षमपणे बाजू मांडली.

Gadchiroli : Two accused who tortured a college going student were sentenced to 10 years.

Share News

copylock

Post Top Ad

-->