दि. 21 जून 2024
Vidarbha News India
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : राज्यभरात 19 जून 2024 पासून पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार होती. पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल करण्यात आलेत. मात्र पोलिस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी करत अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते.
मागील काही दिवसांपासून यावरून राजकारणही तापले होते.
सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. तसेच पाऊस सुरू असल्यामुळे पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी तसेच नेत्यांनी केली होती. अमरावती, सोलापूर, नांदेडमध्ये पोलीस भरती पुढे ढकण्यात आली आहे. राज्यातील पोलीस भरतीवरुन राजकारण तापले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते.
दरम्यान आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलीस जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक मैदानावर चिखल साचला होता. दरम्यान जिथे पाऊस तिथे पोलीस भरती स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, AI ‘एआयचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. एखादा गुन्हा घडवल्यानंतर गुन्हेगाराचे तपासणी असेल, सिसीटीव्ही तपासणी असेल. गाडीची नंबर प्लेट शोधण्यासाठी कॅमेरा नसला तरी एआयचा वापर करुन शोधू शकते. क्राइम सोडवण्यासाठी, ट्रॅफिकच्या अडचणी देखील एआयमुळे कमी होऊ शकतात. असेही त्यांनी सांगितले.