चामोर्शी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे लोकार्पण करा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

चामोर्शी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे लोकार्पण करा

Vidarbha News India:-
VNI:-
चामोर्शी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे लोकार्पण करा 

- आमदार डॉक्टर देवराव होळी यांची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी 
- विद्यार्थ्यांच्या समस्या सोबतच  जिल्ह्यातील समस्यांबाबतही केली मंत्री महोदयांशी चर्चा 

गडचिरोली / चामोर्शी : येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या  सोयी सुविधेसाठी वस्तीगृह मंजूर करण्यात यावा याकरिता आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर  मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी चामोर्शी येथे मागासवर्गीय मुलांसाठी वस्तीगृह मंजूर केले व त्याचे बांधकामही पूर्ण झाले  परंतू या सरकारने अजुन पण पर्यंत या वसतिगृहाचे लोकार्पण केले नाही.
त्यामुळे आपण स्वतःच्या चामोर्शीला दौरा नियोजित करून या वसतिगृहाचे लोकार्पण करावेत अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे  मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली. 
चामोर्शी तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वस्तीगृहाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी तत्कालीन भाजपा  सरकारकडे केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांनी आमदार महोदयांची मागणी मान्य करीत त्या ठिकाणी वस्तीगृह उभारण्यास मंजूरी दिली.  आज वस्तीगृहाचे काम पूर्ण झालेले आहे परंतु  राज्यात सत्तेत आलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदर कामाचे अजून पर्यंत लोकार्पण झालेले नाही त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सदर काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली.

Share News

copylock

Post Top Ad

-->