गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ संवर्गातील ४०० कर्मचाऱ्यांच्या हाेणार बदल्या - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ संवर्गातील ४०० कर्मचाऱ्यांच्या हाेणार बदल्या

Vidarbha News India:-
VNI:-
गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ संवर्गातील ४०० कर्मचाऱ्यांच्या हाेणार बदल्या 


गडचिराेली : जिल्ह्यात अहेरी उपविभागासह काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यांत अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे, तर गडचिराेली, चामाेर्शी, देसाईगंज, आरमाेरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या तालुक्यांत नक्षलवाद्यांचा फारसा प्रभाव नाही. या चार तालुक्यांचा परिसर शहरी भागात माेडताे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी या चार तालुक्यांत सेवा देण्यासाठी सहज तयार हाेतात. अहेरी उपविभागातील भामरागड, सिराेंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी या पाच तालुक्यांत अजूनही साेयी-सुविधांचा अभाव आहे. गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत.
सदर जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया प्रत्यक्ष समुपदेशनाने ५ ते १५ मेदरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विनंती व प्रशासकीय अशा दाेन्ही प्रकारच्या जवळपास ४०० कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या हाेणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात अहेरी उपविभागासह काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यांत अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे, तर गडचिराेली, चामाेर्शी, देसाईगंज, आरमाेरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या तालुक्यांत नक्षलवाद्यांचा फारसा प्रभाव नाही. या चार तालुक्यांचा परिसर शहरी भागात माेडताे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी या चार तालुक्यांत सेवा देण्यासाठी सहज तयार हाेतात. अहेरी उपविभागातील भामरागड, सिराेंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी या पाच तालुक्यांत अजूनही साेयी-सुविधांचा अभाव आहे. अशा स्थितीतही अनेक कर्मचारी त्याच तालुक्यांत सेवा देत आहेत.  या अवघड भागात सेवेची तीन वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सुगम क्षेत्रात बदली देऊन दिलासा देण्याबाबत शासन निर्णयात तरतूद आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाने पार पाडण्यात येणार आहे.  
काेराेना संकटापूर्वी १० टक्के प्रशासकीय व १० टक्के विनंती, अशा २० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत हाेत्या. आता काेराेनापासून एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.
सीईओ सुटीवरून येताच येणार वेग
सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद सुटीवर आपल्या गावी गेले आहेत. ते सुटीवर परत आल्यानंतर यासंदर्भातील प्रक्रियेला गती येणार आहे. १२ आणि १३ मे रोजी बदलीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
अशा हाेतील बदल्या 
जि.प. प्रशानाच्या वतीने १२ ते १५ मे दरम्यान विविध विभागातील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया समुपदेशनाने राबविण्यात येणार आहे. 
यामध्ये १२ मे राेजी महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी, यांत्रिकी, ग्रामीण पाणी पुरवठा, सामान्य प्रशासन, वित्त आदी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार आहेत. 
१३ मे राेजी बांधकाम, आराेग्य तर १४ मे राेजी सिंचन, शिक्षण व पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार आहेत, असे जि.प.च्या पत्रात नमूद आहे.
१७ मे राेजी पंचायत समितीस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार 
आहेत. जि.प. अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेसाठी बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर बदली प्रक्रियेला सुरूवात हाेणार आहे.
दाेन जि.प. शाळांची संचमान्यता नाही
गडचिराेली जिल्हा परिषदेंतर्गत १० ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये चालविली जातात. या १० पैकी चामाेर्शी व सिराेंचा या दाेन ठिकाणच्या शाळांची शासनाच्या वतीने संचमान्यता अद्ययावत करण्यात आली नाही. 
काही वर्षांपूर्वी झालेल्या संचमान्यतेत त्रुटी आढळल्या तेव्हापासून संचमान्यता रखडली आहे. परिणामी जि.प. हायस्कूल शिक्षकांच्या बदल्या थांबल्या आहेत. सिराेंचा व दुर्गम भागातील जि.प.चे माध्यमिक शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून तिकडेच अडकून पडले आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->