स्वतःचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी ग्रामसभांची भूमिका महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी संजय मिणा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

स्वतःचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी ग्रामसभांची भूमिका महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी संजय मिणा

Vidarbha News India:-

VNI :-

स्वतःचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी ग्रामसभांची भूमिका महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी संजय मिणा

- एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने आतापर्यंत 150 च्या वर ग्रामसभांना प्रशिक्षण दिले आहे. गौण वनोपजांचा संग्रह, साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग, व्यापार, प्रतवारी आणि गौण वनउपजांच्या वस्तूंचे वर्गीकरण, ऑडिटींग आणि अकाउंटिंग कसे करायचे या बाबी ग्रामसभांना शिकता आल्या. स्वतःचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी ग्रामसभांची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले. एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नूकतेच गोंडवाना विद्यापीठात पार पडले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी  कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डॉ. सतीश गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.खरं तर ग्रामसभांनी ग्रामसभेसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. तुमच्या माध्यमातून ग्रामसभेचा विकास होईल, यातून रोजगार निर्माण होईल, तुम्ही आर्थिकदृष्टा सक्षम व्हाल. या सगळ्या उपक्रमासाठी मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो असे मनोगत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गौणवनउपज प्रकल्पाच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर, वैभव मसराम, नियाज मुलानी आदी कार्यरत आहे. संचालन आणि आभार डॉ. नरेश मडावी यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Ad

-->