VNI:-
सरपंच अडकला ACB एससीबीच्या जाळ्यात ; ९ हजाराची स्वीकारली लाच
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली पथकाने ९ हजारांची लाच स्वीकारतांना लाचखोर आरोपीच्या राहत्या घरी रंगेहात अटक केली आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारास घरकुल योजनेच्या यादीमध्ये नाव नोंद करुन योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या कामाकरीता आरोपी श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) सरपंच ग्रामपंचायत विक्रमपुर, ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांनी १० हजार रुपयांच्या लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती ९ हजार रुपये लाचेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली.
मात्र तक्रारदाराला लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता लाचखोर सरपंच हे आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तडजोडीअंती ९ हजार रुपये लाच रक्कम चामोर्शी येथिल स्वतः च्या राहते घरात स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ला.प्र.वि. गडचिरोलीचे पो.नि शिवाजी राठोड, पो.नि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थू धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना श्रीनिवास संगोजी पो.शि संदीप उडाण, म.पो.शि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.
सदरची कारवाई ला.प्र.वि. गडचिरोलीचे पो.नि शिवाजी राठोड, पो.नि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थू धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना श्रीनिवास संगोजी पो.शि संदीप उडाण, म.पो.शि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.