दि. २०.०२.२०२३
ठाकरी येथे शिवजयंती मोठया उत्सवात साजरी
गडचिरोली :
प्रतिनिधी/आष्टी : आष्टी जवळील ठाकरी या छोट्याश्या गावात सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. सौ. नंदाताई कुळसंगे सरपंच ग्रापंचायत ठाकरी, उपाध्यक्ष, मां श्री.विठ्ठलराव आचेवर, उपसरपंच ठाकरी, कार्यक्रमाचे उद्घाटक. मां.सौ. रुपलीताई पंदीलवार, जि प.सदस्या यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून मां प्रा.सालुरकर , तसेच प्रा.पांडे, आणि प्रमुख मार्गदर्शक मां.निलकंठ कोहळे यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे संचालन मां. विकास भाऊ आच्चेवार, कार्यक्रमाचे प्रस्तविक श्री.राजेश जोरगलवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मां. नरेश बोळगोडवार यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार मानून केले. सदर कार्यक्रमाला ठाकरी या गावातील महिला मंडळी, युवा वर्ग, व समस्त गावकरी बंधूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.