दि. ०८.०६.२०२३
Vidarbha News India
विदर्भात विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार; हवामान खात्याकडून पुढील तीन दिवसांची माहिती
Vidarbha Weather Forecast :
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : राज्यात मान्सूनचे आगमन लांबले असले तरी अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय.
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पहिल्या दिवशी (८ जून २०२३) सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भात पहिल्या दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील. दुसऱ्या दिवशी (९ जून २०२३) अमरावती, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटसह आणि सोसायट्या वारा प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहणार आहे. तसेच तिसऱ्या दिवशी (१० जून २०२३ अमरावती, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वीजेच्या कडकडाट आणि सोसायट्या वारा प्रतितास ३० ते ४० किलो राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तापमानात कोणतीही वाढ होणार नाही, अशी माहिती नागपूर हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरवर्षी १ जून २०२३ रोजी मान्सून केरळमध्ये येतो. यावर्षी ४ जून २०२३ रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. आता ८ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.