गडचिरोली : १ लाख ३० हजारांची लाच घेताना 'बीडीओ'सह तिघे जण ACB 'एसीबी'च्या जाळ्यात.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : १ लाख ३० हजारांची लाच घेताना 'बीडीओ'सह तिघे जण ACB 'एसीबी'च्या जाळ्यात.!

दि. २६.०८.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली : १ लाख ३० हजारांची लाच घेताना 'बीडीओ'सह तिघे जण ACB 'एसीबी'च्या जाळ्यात.!

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदू कंत्राटदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

प्रतीक दिवाकर चन्नावार, संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील प्रतीक चन्नावार हा प्रभारी गटविकास अधिकारी असून, संजीव कोठारी हा कंत्राटी पेसा समन्वयक, तर अनिल गोवर्धन हा खासगी इसम आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंदूपानांचे युनिट लिलावाद्वारे खरेदी केले होते. या तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली.

परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सापळा रचला असता खासगी इसम अनिल गोवर्धन याच्यामार्फतीने तक्रारकर्त्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, हवालदार नत्थू धोटे, राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजारकर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली.


Share News

copylock

Post Top Ad

-->