दि. २५.०८.२०२३
Vidarbha News India
चंद्रपूर : सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर...
Cultural programs
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात 'साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूरकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जागर करीत या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना व्यक्त केली.
23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.05 वाजता भारताच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान -3 हे मिशन यशस्वी करून दाखविले. या गोष्टीचा जोश नागरिकांमध्ये होताच. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या 'साद सह्याद्रीची...भुमी महाराष्ट्राची' या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात डौलाने फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्साह अभुतपूर्व होता. cultural programs सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आले होते.
प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुजा सावंत तसेच प्रसिध्द गायक नंदेश उमप यांच्यासह जवळपास 300 कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात शिवराज्याभिषेक सोहळा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, वारकर्यांच्या वेशातील सादरीकरण, देवीचा जागर, अस्सल मराठी नृत्य, पोवाडा, सीमेवरील जवानांच्या वेशातील सादरीकरण अशा विविध नृत्यांनी आसमंत दणाणला. cultural programs चांद्रयान मोहिमेचे यश, वैज्ञानिकांचे परिश्रमाचे फळ आणि देशभक्तीचा जागर असा त्रिवेणी संगम बुधवारी चंद्रपुरात अनुभवायला मिळाला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री पुजा सावंत, सोनाली कुलकर्णी, गायक नंदेश उमप यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.