दि.२६.०८.२०२३
Vidarbha News India
गोंडवाना विद्यापीठात प्रा. शुभम बुटले यांचे 'मराठी साहित्याची ओळख' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पदव्युत्तर शैक्षणिक इतिहास विभागाद्वारे आज गोंडवाना विद्यापीठात 'क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व्याख्यानमाला' अंतर्गत 'मराठी साहित्याची ओळख' या विषयांवर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत सोनवणे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. उत्तमचंद कांबळे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर मने, प्रा.डॉ.आठवले मॅडम, प्रा.डॉ. प्रीती पाटील मॅडम, प्रा. प्रमोद जावरे, प्रा.डॉ.संतोष सुरडकर सर उपस्थित होते.
मराठी साहित्याची ओळख करून देताना प्राध्यापक शुभम बुटले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटले कि, मराठी साहित्य म्हणजे महाराष्ट्र प्रदेशातील मराठी भाषेत लिहिलेल्या ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. साहित्यकृतीं यामध्ये लोकगीते, गद्य, कविता आणि लहान पद्यांचा समावेश असतो.
अभिजात मराठी साहित्य
कादंबरी,कथा,कविता,ललित लेख (कविता ,नाटक,लोक साहित्य,बाल साहित्य,कथा,विनोद,अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।,समीक्षा,चारोळी,गझल,ओवी,अभंग,भजन,
कीर्तन,पोवाडा,लावणी,भारूड,बखर,पोथी,आरती,
लोकगीत,गोंधळ,उखाणे इत्यादी...
साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. ‘लिटरेचर’या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ‘साहित्य’ वा ‘वाङ्मय’ हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात.
वाङ्मयामध्ये बोलल्या गेलेल्या व लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश होतो. जे जे उच्चारले जाते ते ते सर्व वाङ्मय म्हणून गणले जात असल्याने कलात्मक वाङ्मयाचा वेगळा निर्देश करण्यासाठी त्याला काही अन्वर्थक विशेषणे जोडली जातात. उदा., ललित वाङ्मय. ललित (फाइन) म्हणजे सुंदर. तेव्हा या विशेषणाने कलात्मक वा सौंदर्यपूर्ण वाङ्मयाचा निर्देश केला जातो. व्यवहारोपयोगी वा जीवनोपयोगी कलांपेक्षा त्याचे वेगळेपण व उपयुक्ततेच्या निकषापलीकडे असलेली अर्थवत्ता ललित या विशेषणाने सूचित होते.
यावेळी प्राध्यापक शुभम बुटले यांनी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा संबोधित केले की UPSC यु.पी.एस.ई अभ्यासक्रमात महानुभाव लेखक, वारकरी लेखक, पंडित कवी, शकरी कवी आणि बखर साहित्य यांच्या साहित्यकृतींचा समावेश असतो.
आपल्या जीवनात शैक्षणिक विकास घडवण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना समोर संबोधित करताना त्यांनी असे ही म्हटले की, मराठी साहित्य विविध साहित्यकार, समाजसुधारक, संत, लेखक, कवी यांचे चरित्र लेखन वाचून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी वाचन साहित्यचां वापर केला पाहिजे.
मराठी साहित्य विषयावर तुमची पकड ही अभ्यासपूर्ण असायला हवी.
संतांचे अभंग, कादंबरी साहित्यकार यांचे लेखन जीवन चरित्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या लेखन पुस्तकाचे वाचन आपण सर्व जण केले पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना प्रा. डॉ. प्रशांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना अभिजात भाषे बद्दल माहिती दिली. आणि कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्या अगोदर आपण त्या संबंधित गोष्टीचा अभ्यास व परीक्षण केले पाहिजे असे संबोधित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमाकांत चव्हाण यांनी केले. प्राध्यापक सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.