हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुबियांशी खासदार अशोकजी नेते यांची सांत्वन भेट - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुबियांशी खासदार अशोकजी नेते यांची सांत्वन भेट

दि. १९.१०.२०२३
Vidarbha News India
हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुबियांशी खासदार अशोकजी नेते यांची सांत्वन भेट  
- हत्तीच्या सोंडेने चिरडून हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोकजी नेते यांची दिभना येथे सांत्वना भेट
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने तीन आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या दिभना गावातील शेतात घुसलेल्या हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न काही शेतकरी करत होते. या गडबडीत चवताळलेला एक हत्ती मागे लागला. त्यामुळे पळण्याच्या प्रयत्नात होमाजी बाबाजी गुरनुले  हे खाली पडले आणि हत्तीने त्यांना सोंडेने उचलून चिरडले.ही घटना दि.१७ ऑक्टोंबर २०२३ ला मंगळवारच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. 
या घटनेची माहिती खासदार अशोक नेते यांना कळताच लगेचच विलंब न करता दरम्यान या घटनेनंतर बुधवारी खासदार अशोक नेते यांनी दिभना येथे गुरनुले यांच्या घरी जाऊन त्यांच्या वृद्ध वडीलांची सांत्वना केली. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये आणि खासदार अशोक नेते यांनी आपल्या वतीने काही आर्थिक मदत त्यांना दिली. 
या घटनेमुळे सध्या शेतात पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या व सायंकाळच्या सुमारात शेतात काम करण्याकरिता जावे लागते. मात्र या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खासदार अशोक नेते यांनी यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हतीच्या कळपाचा बंदोबस्त करा हाकलून लावा. अशा सुचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार अशोकजी नेते यांनी दिल्या.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी,वनरक्षक शिवनकर,वनरक्षक काकेवार, वनरक्षक फोकळी,वनरक्षक सयाम,वनिता जेंगठे,विलास जेंगठे,सुभाष गुरनुले, अशोक जेंगठे, बुधाजी मोहूरले,तसेच गुरनुले यांचे अनेक नातेवाईक आणि गावकरी यावेळी उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->