दि. २०.१०.२०२३
गरजू गरीब रुग्णांवर आपला दवाखान्यातून आत्मीयतेने उपचार करा; - आ. डॉ. देवरावजी होळी
- चामोर्शी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते आपला दवाखान्याचे उद्घाटन
- शहरात आपला दवाखाना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रत्येक शहरांमध्ये आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून चामोर्शी नगरात शहर आरोग्यवर्धिनी आपला दवाखाना मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. या आपला दवाखान्यातून गरजू गरीब रुग्णांवर आत्मीयतेने उपचार करावे असे प्रतिपादन त्यांनी या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायलवार, उपाध्यक्ष लोमेशभाऊ बुरांडे, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तहसिलदार प्रशांतजी घोरुडे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल हूलके, पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब, मुख्याधिकारी श्रीकांतजी लगानेकर यांचे सह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.