दि. २०.१०.२०२३
चामोर्शी तालुक्यातील सर्वच २०४ गावांतील घरांना घराचे (सनद) पट्टे वाटप सुरु
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उमरी येथे महास्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप शिबिराचा शुभारंभ
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून भूमी अभिलेख कार्यालयाचा पुढाकार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील २०४ गावांपैकी १८६ गावांचे सिटी-गावठाण सर्वेक्षण पूर्ण झाले असून १८ रीठ गावे आहेत या सर्वच गावातील घरांना लवकरच घराचे व त्या जागेचे पट्टे सनद मिळणार असून या सनद पट्टे वाटपाचा शुभारंभ आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या शुभहस्ते उमरी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उमरी व परिसरातील ५ गावच्या लोकांना त्यांच्या घरांचे पट्टे सनद वाटप करण्यात आले.
मा.नंदा आंबेकर प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली, उत्तम तोडसाम उपविभागीय अधिकारी चामोर्शी प्रशांत बोरुडे तहसीलदार चामोर्शी, सागर पाटील सर संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी , उमरी येथील सरपंच, सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
महास्वामित्व योजनेअंतर्गत चामोर्शी तालुक्यातील सर्वच गावांचे सिटी - गावठाण सर्वेक्षण झालेले असल्याने गावातील घरांना त्यांच्या घराचे व जागेचे पट्टे सनद लवकरच मिळणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.