दि. 28.11.2023
गडचिरोली : आश्रम शाळा ताडगांव येथील विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, ताडगांव येथील विद्यार्थ्यांची आदिवासी विकास प्रकल्प भामरागड मधून विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेली आहे.
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, तोडसा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलन २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पार पडले. क्रीडा संमेलनात भामरागड प्रकल्पातील ४ केंद्र सहभागी झाले होते. त्यात ताडगाव, लाहेरी, कसनसुर व तोडसा येथील अंदाजे ८०० ते ८५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संमेलनात वैयक्तिक व सांघिक खेळ आयोजित करण्यात आले.
त्यात ताडगाव केंद्रांतर्गत शासकीय आश्रम शाळा, ताडगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रीती रेणू गावडे, कविता कुम्मा मडावी, मीना कुम्मा मडावी, मीना मंगु गावडे, किरण अडवे कोवासी, सरिता पांडू मडावी, रोहित भगवान वेलादी, अर्जुन पत्रु मडावी, अमित रामदास मडावी, रोहित पापी मडावी इत्यादी विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापक एस. एल. धंदर, अधिक्षक पाझारे, अधिक्षिका चल्लावार, EGF इजिएफ फेलो सुरज तुपट, क्रीडा शिक्षक धुर्वा, कटलावर, सिडाम, गजभिये, थोटे, जनबंधू, कांबळे, वनकर, कुमरे, गेडाम, मिस्त्री, उईके, निमडर, वालदे, जांभूळकर इत्यादी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदानी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.