दि. २८.११.२०२३
जि.प उच्च प्राथ शाळा 'मुरखळा-माल' येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे २८ नोव्हेंबर रोज मंगळवार ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक जगदीश कळाम सर, राजकुमार कुळसंगे सर, गावातील अंगणवाडी सेविका सुरेखा राऊत मॅडम, पुष्पा बुरे मॅडम,मदतनीस पिंपळवार मॅडम, राऊत मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत...
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्मृतिदिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक राजकुमार कुळसंगे सर यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.
आजच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर सर होते. विशेष अतिथी म्हणून अंगणवाडी सेविका सुरेखा राऊत मॅडम,पुष्पा बुरे मॅडम,मदतनीस पिंपळवार मॅडम, राऊत मॅडम,जगदीश कळाम सर, राजकुमार कुळसंगे सर आदी मान्यवर लाभले होते.
सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर यांनी आपल्या भाषणातुन थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवनकार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश कळाम सर यांनी केले.