हिवाळी अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणार ;- आमदार डॉ. देवराव होळी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

हिवाळी अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणार ;- आमदार डॉ. देवराव होळी

दि. ०७.१२.२०२३ 
Vidarbha News India 
हिवाळी अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणार ;- आमदार डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/गडचिरोली : महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्न तारांकित, लक्षवेधी व औचित्याचे मुद्दे या माध्यमातून सभागृहात मांडून याकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे. यात जिल्ह्यातील व विधानसभा क्षेत्रातील ३८ तारांकित, १७ लक्षवेधी प्रश्न ऑनलाइन सादर करण्यात आले असल्याची माहिती, इंदिरा गांधी चौक जवळील शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी माहिती देतांना हिवाळी अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या व गरजा लक्षात घेता महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विशेष मागणी करणार असे ते म्हणाले, 
समोर बोलताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातील होणाऱ्या वाघाच्या व हत्तीच्या हल्ल्यामध्ये मृतांच्या कुटुंबांमधील व्यक्तींना सरकारी नोकरी देण्यात यावी व हत्तीचं, वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. 
गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी ३५ कोटी ६९ लाख रुपयाचा निधी मागीतला असून हा प्रश्न सभागृहात उपस्थित करणार आहे.
मार्कंडा देवस्थानचे रखडलेला काम पूर्ण होण्यासाठी तसेच गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा व गटर लाईन आणि रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या दुरुस्तीसाठी निधी, भेंडाळा येथील उपसा सिंचन, वसा-पोर्ला उपसा सिंचन, गोगाव उपसा सिंचन आदींबाबत सभागृहाचे लक्ष वेधले जाणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व समाजातील व्यक्तींच्या २०११ पूर्वीच्या अतिक्रमण वन जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी मागणी व प्रयत्न करणार, तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज ची मागणी करणारा पहिला आमदार असुन स्वता डॉ. असल्यामुळे  या विषयाला मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय मार्गी लावून मंजुरी मिळून दिली. असे ते म्हणाले, २०२४-२५ मध्ये मेडिकल कॉलेज भरती प्रवेश प्रक्रिये मध्ये पहिली बॅच सुरू करावी, व गडचिरोलीत नाट्य सभागृह, आष्टी पेपर मिलची जागा ही सरकारने जमा करून त्यामध्ये नवीन औद्योगीकरणाला ती जमीन देण्यात यावी, ज्यांच्या जमिनी गेल्या त्या व्यक्तींना कंपनीमध्ये परमनंट नोकरी देण्यात यावी, इत्यादी विविध लक्षवेधी तारांकित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन या कामासाठी हिवाळी अधिवेशनात विशेष निधीची मागणी करणार, असे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दि.६ डिसेंबर ला पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला प्रामुख्याने आमदार डॉ. देवराव होळी, तथा माजी नगराध्यक्ष भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर,भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजपा शहर अध्यक्ष महिला आघाडी कविता उरकुडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, मारुती इंचोडकर, हेमंत बोरकुटे, इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->