गडचिरोली नगरपरिषदेच्या वतीने भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली नगरपरिषदेच्या वतीने भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम.!

दि. २ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
गडचिरोली नगरपरिषदेच्या वतीने भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम.!
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत व समाजकल्याण विभाग व दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विध्यमाने उपक्रम.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली शहरात महिलांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत.महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एकत्रितरीत्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याने गडचिरोली शहरातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. याकरिता स्थानिक आठवडी बाजार परिसर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला लाभार्त्यांचा भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष मा. सौ.योगीताताई पिपरे तर अध्यक्ष नप प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. सुर्यकांत पिदुरकर होते.मार्गदर्शक प्रा.डॉ. सविता साधमवार,प्रमुख अतिथी माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,माजी नगरसेविका लताताई लाटकर,माजी माजी नगरसेवक संजय मेश्राम,उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार,अभियंता भालेराव,पुष्पाताई करकाडे नप कर्मचारी तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते "सोन चिरैया शहर उपजीविका" केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.

Share News

copylock

Post Top Ad

-->