दि. 15 जानेवारी 2024
भाजपा जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीला आवर्जून या; आ. डॉ. देवराव होळी यांचे आवाहन.!
- १६ जानेवारी २०२४ रोजी सुमानंद मंगल कार्यालयामध्ये सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा कार्य समितीची बैठक १६ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला सकाळी ११ वाजता सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे निश्चित करण्यात आली असून या बैठकीला भाजपा जिल्हा कार्य समितीच्या सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी या माध्यमातून केले आहे.
बैठकीला भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डिवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, यांचे सह प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.