दि. 14 मार्च 2024
Vidarbha News India
घरकुल बांधकाम करणाऱ्यांना 5 ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या; आमदार डॉ. देवराव होळी
- जिल्हाधिकारी संजयजी दैने यांना निवेदन.!
- मुबलक रेती साठा असूनही रेती उपलब्ध होत नसल्याने गरिबांच्या घरकुलांचे बांधकाम थांबले.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात असूनही रेतीघाटांचे लिलाव होत नसल्याने गरीब लोकांच्या घरकुलाचे, शौचालयाचे व घरांचे बांधकाम थांबलेले आहे त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणारी 5 ब्रास मोफत रेती तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोलीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांची भेट घेऊन केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, युवा नेते अनुराग पिपरे यांचे सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.