शिष्यवृत्ती परीक्षेत कुनघाडा रै. येथील कन्या शाळेची गगन भरारी.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

शिष्यवृत्ती परीक्षेत कुनघाडा रै. येथील कन्या शाळेची गगन भरारी.!

दि. 03.05.2024
Vidarbha News India 
शिष्यवृत्ती परीक्षेत कुनघाडा रै. येथील कन्या शाळेची गगन भरारी.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा रै. येथील 6 विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. 
दरवर्षीप्रमाणे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत.. 
अक्षरा विजय दूधबावरे,ख़ुशी निलेश टिकले,किष्टी श्रीनिवास बंडमवार,समृद्धी रवींद्र कुनघाडकर,आराध्या प्रवेश मेश्राम,मनस्वी रुपेश दूधबळे ह्या विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले आहेत.
विशेष बाब म्हणजे यातील 5 विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेतही आपली यशाची मोहर उमटवलेली आहे.
शाळेने 2019 पासून नवोदय परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेतही उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
सत्राच्या सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी, सराव, रात्र कालीन वर्ग, गृहभेटी, पुरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी, प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता पालकांचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी पाटील सर, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर गव्हारे, सर्व पदाधिकारी व पालकांनी मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक वर्षा गौरकर, वर्गशिक्षक निमाई मंडल,रोशन बागडे,गौतम गेडाम, प्रीती नवघडे रेखा हटनागर, विलास मेश्राम यांना दिलेले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->